Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रपत्रकार दिनानिमित्त वृक्षाना मान्यवर पत्रकारांची नावं देण्याचा देवडीत अनोखा उपक्रम..

पत्रकार दिनानिमित्त वृक्षाना मान्यवर पत्रकारांची नावं देण्याचा देवडीत अनोखा उपक्रम..

लोणावळा : मराठीतील मान्यवर संपादक, पत्रकारांचे कायम स्मरण राहावे यासाठी त्यांची नावं वृक्षांना देण्याचा अभिनव उपक्रम वडवणी तालुक्यातील (बीड जिल्हा) देवडी येथे आयोजित करण्यात आला होता.

झाडांना दिवंगत पत्रकारांची नावं देऊन त्यांच्या स्मृती जतन करण्याची कल्पना हा उपक़म राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलाच आहे. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक़मास बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अजित कुंभार, चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सुनील वाळुंज, श्रावणी कामत यांच्यासह बीड जिल्हा व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page