Saturday, September 21, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडपरिमंडळ 2 चे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांची बदली व पदोन्नती...

परिमंडळ 2 चे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांची बदली व पदोन्नती…

पिंपरी ( प्रतिनिधी ): पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त तसेच वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड विभागाचे प्रमुख आनंद ( आबा ) भोईटे यांची बदली पुणे ग्रामीण बारामती अप्पर पोलीस अधीक्षकपदी झाली आहे.
पोलीस उपायुक्त आनंद ( आबा ) भोईटे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात 2020 मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ संपल्याने महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या वतीने सोमवार दि. 7 रोजी 104 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली मध्ये, भोईटे यांना पुणे ग्रामीण बारामती अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
भोईटे यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मोक्का व तडीपारी अश्या 110 जणांवर कारवाई केली . पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या माध्यमातून ब्लॅक स्पॉट तसेच होणारी वाहतूक कोंडी बंद केली . वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी चांदणी चौक , चाकण , मोशी , हिंजवडी आदी ठिकाणी योग्य नियोजन केले . 5000 बुलेट राजांवर कारवाई तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली .
कार्यक्षम अधिकारी आनंद भोईटे यांची बदली बारामती अप्पर पोलीस अधीक्षक पदी झाल्याबद्दल पोलीस उप निरीक्षक रमेश पवार , सहाय्यक फौजदार शंकर चिंचकर , पोलीस अंमलदार दिलीप भरेकर , संजय लोहोटे , सागर पंडित , महेश खांडेकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page