
कार्ला- मावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मावळ युवासेनेच्या वतिने टाकवे येथील समुद्रा कोविड सेंटरमधील डाॕक्टर व कर्मचाऱ्यांना पीपीई किट तर याठीकाणी असणा-या रुग्णांसाठी फळे व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले.तसेच वेहरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी युवासेना विस्तारक राजेश पळसकर,तालुका प्रमुख राजेश खांडभोर,मावळ तालुका युवासेना प्रमुख अनिकेत घुले,मावळ युवासेना समन्वयक विनायक हुलावळे,युवासेना विभाग प्रमुख दत्तात्रय केदारी,मळवली शाखा प्रमुख नरेश वाल्हेकर,उपविभाग प्रमूख शुभम गायकवाड,गोपाळ मावकर यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थितीत होते.