पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 झाडे लावण्यात आली….

0
48

तळेगाव दि.१३ पर्यटन व पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने विविध भागात 500 झाडे लावण्यात आली.

त्यावेळी तळेगाव दाभाडे येथील ( यशवंतनगर ) आणि वेगवेगळ्या परिसरात वृक्षारोपण करून युवा सेनेच्या वतीने पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यासाठी शहरप्रमुख दत्ता भाऊ भेगडे, उपशहरप्रमुख अमोल पाटील व महाराष्ट्र वाहतुक सेना तळेगाव शहर यांच्या नियोजनातून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास युवासेना संघटक राजेशजी पळसकर,तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर,महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष महेशजी केदारी, तळेगाव महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष सतिश भाऊ शेलार, सुनील निंभोरे, तळेगाव महिला अध्यक्ष रूपाली ताई आहेर, सानिका पाटील, संगिता सोनवणे, शितल शिवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.