Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळापळसदरी येथे रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

पळसदरी येथे रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी): जांबरुग ते पळसदरी हद्दीत रेल्वे की मी 104/62 दरम्यान 30 ते 35 वर्षीय अज्ञात तरुणाचा रेल्वे एक्सप्रेसची जोरदार धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.7 रोजी दुपारी 12 वा. च्या सुमारास घडली. रेल्वेच्या धडकेने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज लोहमार्ग पोलीस हवालदार ए. डी. जाधव यांनी वर्तविला आहे.
सदर मयत हा अनोळखी पुरुष असून वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. त्याच्या उजव्या पायावर पांढरा कोड असून डाव्या पायाचा अंगठा नाही. तसेच शरीर किरकोळ बांधा, रंग काळा सावळा, कपाळ मध्यम, दाढी, मिशी व डोक्यावर काळे केस असे मयताचे वर्णन असून अंगात फिकट गुलाबी फुल हाताचा शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट असे कपडे घातले आहेत.
सदर मयताची ओळख पटल्यास लोहमार्ग पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन लोहमार्ग पोलीस हवालदार ए. डी. जाधव यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page