Wednesday, December 18, 2024
Homeपुणेमावळपवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश तर दुसऱ्याचे शोधकार्य...

पवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश तर दुसऱ्याचे शोधकार्य सुरु…

मावळ :प्रतिनिधी :पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.असून त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्कू पथकाला यश आले आहे.
मयूर रविंद्र भारसाके (वय 25) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.26 दोघेही सध्या रा.पुणे, मुळ, रा. लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर, वरणगांव, भुसावळ) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बालेवाडी येथे एका खासगी कंपनीमध्ये काम करणारे आठ ते दहा तरुण पवना धरण परिसरात बुधवारी (दि.4) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिरायला आले होते.सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ते धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले.ते बालेवाडी येथे एका खासगी कंपनी मध्ये नोकरी करत होते. त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश न आल्याने सायंकाळी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेसक्यू पथकाला पाचारण करण्यात आले.
तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली.लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक व शिवदुर्ग रेसक्यू पथक यांनी घटनास्थळी पोहचत शोध मोहीम सुरू केली. पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी मयूर याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.तर तुषारचा मृतदेह सापडला नसल्याने आज त्याचा शोध घेतला जाणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page