Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळपवना धरणात बुडालेल्या 18 वर्षीय पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश..

पवना धरणात बुडालेल्या 18 वर्षीय पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश..

पवना (प्रतिनिधी):मुंबई भागातून पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या 18 सदस्यांच्या ग्रुपमधील एक तरुण पवना धरण जलाशयात बुडाल्याची घटना शनिवार दि.22 रोजी घडली.साहिल विजय सावंत (वय 18, रा. लोअर परेल, मुंबई) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
मावळ तालुक्यातील आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र मावळ आणि लोणावळा ग्रामीण पोलिस यांच्याकडून सदर तरुणाचा दोन दिवस कसून शोध घेतला असता आज अखेर साहील चा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई भागातील 9 युवक आणि 9 युवतींचा ग्रुप शनिवारी दि.22 एप्रिल रोजी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. लोणावळा परिसर फिरून झाल्यांनतर हा ग्रुप पवना धरण परिसर फिरण्यासाठी आले. त्यावेळी ते फांगणे गावच्या हद्दीतील पवना धरण जलाशयात पोहोण्यासाठी उतरले असता यापैकी साहिल हा पाण्यात बुडाला. दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आज मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page