पवना धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू…..

0
500

पवना नगर दि. 1: पवना धरण येथे कॅम्पिंगसाठी गेलेल्या 33 वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 11 वा. च्या सुमारास घडली.


सौरभ मलीक ( वय 33, रा. गौतम नगर नोएडा, उत्तर प्रदेश, सध्या रा.कैवल्य धाम तुंगार्ली, लोणावळा ) हा फोटो काढत असताना पाय घसरून पाण्यात बुडू लागल्याने सोबत असलेले सुनील रच्या यांनी व तिथे असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पाण्या बाहेर काढले असता तो बेशुद्ध झाला होता. त्याला उपचारासाठी कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
त्यासंदर्भात अंकुर हरपालसिंह चौधरी ( वय 41, सध्या रा. कैवल्यधाम, तुंगार्ली लोणावळा, मूळ रा. गल्ली नं. 1:शिवपुरी, निवाडी रोड, मोदीनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश ) याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो. स्टेशनमध्ये र. नं. 29/2020 सी. आर. पी. सी.174 प्रमाणे अकस्मित मयत दाखल करण्यात आले असून, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. एस. एम. शेख हे पुढील तपास करत आहेत.