
पवना नगर (प्रतिनिधी):पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या 62 वर्षीय पर्यटक शिक्षकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना. रविवार दि.8 रोजी सकाळी 11 च्या सुमारास दुधिवरे गावच्या हद्दीतील लेक व्युव सोसायटी हद्दीत संतोष चाळके यांच्या बंगल्यामागील पवना धरण येथे घडली.
प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया ( वय 62,रा.138/4661 कुर्ला ईस्ट, मुंबई नेहरूनगर सध्या रा. एकज्योत सन्मान नववा मजला, प्लॉट नं.23 पोस्टल कॉलनी, मा हॉस्पिटल जवळ, चेंबूर मुंबई 71 ) असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार आज दि. 8 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुधीवरे तालुका मावळ गावचे हद्दीतील लेक व्युव सोसायटी येथे संतोष चाळके यांच्या बंगल्याच्या पाठीमागील पवना डॅमच्या पाण्यामध्ये प्रेमप्रकाश हे त्यांच्या मित्रासह त्यांचे मित्र संतोष चाळके यांच्याकडे राहण्यास आले होते. आज सकाळी 11 वाजता पोहण्यासाठी पवना डॅम मध्ये गेले असता कीनार्यापासून थोड्या अंतरावर परत येताना त्यांना दम लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले हे पुढील तपास करत आहेत.
प्रेत धरणाच्या पाण्यात काही अंतरावर असल्यामुळे लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे सुनील गायकवाड, सागर कुंभार, महेश मसने, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, कपिल दळवी, सतीश आहेर, अतुल लाड यांच्या पथकाने प्रेत बाहेर काढले.