Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळपवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा, पिंपरी चिंचवड सह मावळवासियांना मोठा दिलासा...

पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा, पिंपरी चिंचवड सह मावळवासियांना मोठा दिलासा…

मावळ : मावळातील पवना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असताना सध्या पवनात 70.42 टक्के पाणी साठा आहे.

पिंपरी -चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे . मागील चोवीस तासात 34 मि मी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 2.62 टक्क्यांनी वाढत धरणात एकूण 70.42 टक्के पाणीसाठा झाला आहे .

पिंपरी -चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या पवना धरणातून महापालिका सध्या 510 एम. एल. डी.पाणी उचलते . शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो . सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

सध्या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 34 मि.मि.तर 1 जूनपासून झालेला पाऊस 1,461 मि.मि. आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 798 मि.मि. त्यानुसार धरणातील सध्याचा पाणीसाठा 70.42 टक्के असून गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 40.44 टक्के इतका होता,मागील 24 तासात पाणीसाठ्यात 2.62 टक्के वाढ होत.70.42 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page