Thursday, October 10, 2024
Homeपुणेमावळपवना नगर काले ग्रामपंचायत क्षेत्रात होणार एकदिवसीय कोविड 19 कुटुंब सर्वेक्षण.....

पवना नगर काले ग्रामपंचायत क्षेत्रात होणार एकदिवसीय कोविड 19 कुटुंब सर्वेक्षण…..

मावळ : मावळातील काले ग्रामपंचायत क्षेत्रात दि. 26/9/2020, शनिवार रोजी होणार कोविड 19 विशेष कुटुंब सर्वेक्षण. सध्या कोरोना विषाणूच्या काळात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व गावांचे आठवड्यातून एक दिवस नेमून कोविड 19 कुटुंब सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशानुसार शनिवार दि. 26 रोजी काले ग्रामपंचायत क्षेत्रातील गावठाण दलित वस्ती, दाभाडे वस्ती, मोहोळ वस्ती, घोणेवाडी परिसर, गावडे वस्ती, संग्राम वस्ती, घरदाळे वस्ती, जलसंपदा विभाग वसाहत तसेच आदिवासी वस्ती इत्यादी परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन हे कुटुंब सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सदर कुटुंब सर्वेक्षण कार्यात एक शासकीय शिक्षक, एक आशा सेविका, एक स्वयंसेवक व एक ग्रामपंचायत सदस्य अशा चार जणांच्या टिमला वरीलपैकी एक परिसर नेमून दिला आहे. नियुक्त आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी यांनी शनिवारी सकाळी 7: 00 ते दुपारी 01:00 ह्या कालावधीत नेमून दिलेल्या आपापल्या भागातील कुटुंबांचे सर्वेक्षण करून ग्रामसेवक यांनी सर्वेक्षण झाल्यानंतर प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल मावळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा तरी शनिवार दि. 26 रोजी काले ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी घरी राहून आपली तपासणी करून शासकीय कार्यास सहकार्य करावे अशा सूचना मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page