लोणावळा : पवना नगर भागातील आंबेगाव गावाच्या हद्दीतील एका कॅम्पींग साईटवर बेकायदा विगर परवाना अवैध्द दारुचा साठा जवळ बाळगुन आपले ओळखीच्या लोकांना चोरुन विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 21 हजार 280 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. निलेश येवले (रा. शिवली ता. मावळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय खबर मिळाली की संबंधित व्यक्ती बेकायदा दारू विक्री करीत आहे. पो. नि. धुमाळ यांनी तात्काळ सहा. पो. नि. शेवते, पोलीस हवा. विजय गाले, प्रकाश कडाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पी.पी. काळे यांना बातमीच्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना पाहून आरोपी निलेश येवले हा कावरा बावरा होवुन पळुन जाण्याचे तयारीत असताना त्याला लागलीच ताब्यात घेतले. तद्नंतर कॅम्पींगची पाहणी केली असताना कॅम्पींगच्या किचनमध्ये खाकी रंगाचे एकुन 10 बॉक्समध्ये 21, 280 रुपये किमतीच्या एकुन 112 किंगफिशर स्ट्रॉंग कंपनीच्या बिअरच्या बाटल्या पोलिसांना मिळुन आल्या.
याप्रकरणी पो. हवा. प्रकाश कडाळे यांनी फिर्याद दिली असून आरोपी निलेश याच्याविरुध्द सरकारतर्फे महा. प्रो. कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पो.नि. किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.