Sunday, September 24, 2023
Homeपुणेमावळपवना नगर बाजारपेठेतील किराणा दुकानदारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई....

पवना नगर बाजारपेठेतील किराणा दुकानदारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई….

गॅस सिलेंडर विक्री करत असताना 43 सिलेंडर जप्त…

पवना नगर दि. 14: पवना नगर बाजारपेठेतील किराणा मालाच्या आडोशात विना परवाना गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकान व्यवसायिकावर छापा मारून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
43 सिलेंडर जप्त करून दुकान व्यावसायिकास अटक करण्यात आली.संदीप बाबुलाल भुतडा ( रा. पवना नगर, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. कॉ. सुनील परशुराम गवारी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संदीप भुतडा हे त्यांच्या किराणा मालाच्या व्यवसायाच्या आडून हे बेकायदेशीर गॅस विक्री करत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळताच पवना नगर बिट अंमलदार शकिल शेख, संतोष शेळके, सुनील गवारी व होमगार्ड भिमराव वाळुंज यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून दुकानदारास रंगेहात पकडले त्यावेळी त्याच्याकडील विनापरवाना विक्री करत असलेले 43 कमर्शिअल गॅस सिलेंडर जप्त करून आरोपी संदीप भुतडा याला अटक करण्यात आली आहे.
त्यासंदर्भात आरोपी संदीप भुतडा यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शकिल शेख व संतोष शेळके हे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -