Thursday, September 28, 2023
Homeक्राईमकॅम्पिंग पवना नाईट हंट वर छापा मारून अवैध हुक्का साहित्य जप्त.. लोणावळा...

कॅम्पिंग पवना नाईट हंट वर छापा मारून अवैध हुक्का साहित्य जप्त.. लोणावळा ग्रामीणची कारवाई..

पवना नगर दि. 31: रोजी पवना नगर येथील खडक गेव्हंडे गावातील ” कॅम्पिंग पवना नाईट हंट “याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारून अवैध हुक्का साहित्य व माल एकूण 700 रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यासंदर्भात पो. ना. संतोष शेळके यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पो. ना. संतोष शेळके, पो. हवा. एस. एम. शेख, पो. कॉ. एस. पी. गवारी, होमगार्ड बी. जी. वाळुंज हे सर्व पवना नगर मदत केंद्र येथे रात्र गस्त घालत असताना. पो. हवा. एस. एम. शेख यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की खडक गेव्हंडे गावातील ” कॅम्पिंग पवना नाईट हंट ” मध्ये अवैध हुक्का बार चालविला जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्र गस्तावरील पोलिसांच्या टीमने घटनास्थळी अचानक छापा मारला असता तेथील काउंटरच्या खाली हुक्का पॉट व चिलम, हुक्का पिण्याकरिता वापरण्यात येणारा पाईप, कोळशाच्या दोन वड्या असा 700 रु. हुक्का साहित्य व माल मिळून आला.
कुठलाही प्रकारचा हुक्का बारचा परवाना नसताना इथे येणाऱ्या ग्राहकांना अवैध रित्या हुक्का पुरविल्या प्रकरणी किरण वसंत काळे ( वय 25, रा. ब्राम्हणोली, ता. मावळ, जि. पुणे ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सिगारेट व अन्य तंबाखू जन्य अधिनियम 2004 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -