Wednesday, September 27, 2023
Homeपुणेमावळपवना नगर रस्त्यावर स्थानिकांचे अतिक्रमण..

पवना नगर रस्त्यावर स्थानिकांचे अतिक्रमण..

पवना नगर दि.12: पवना नगर येथील काले कॉलनी ह्या भागातील रस्त्यावर अतिक्रमण, सामान्य नागरिकांना नाहक त्रास. पवना नगर, काले कॉलनी येथील शासकीय वसाहती लगतचा मुख्य रस्ता हा अरुंद असून तेथील दळणवळनासाठी अपुरा आहे.
अशातच काले कॉलनी भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला नवनवीन दुकाने व टपऱ्याचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखी अरुंद झाला असून येथील नागरिकांना प्रवासासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
त्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.
- Advertisment -