पवना विद्यामंदिर शाळेचा 10 वी चा निकाल 98.21टक्के..

0
471


पवनानगर -मावळ (कार्ला प्रतिनिधी दी.29 जुलै 2020) महाराष्ट्र राज्यातील दहावीचा निकाल आज घोषित झाला असून पवनानगर येथील पवना विद्या मंदिर शाळेचा निकाल ९८ .२१ टक्के लागला असून शाळेतील तिनही क्रमांकवर मुलींनींच बाजी मारली आहे.

कु शितल रोहिदास कालेकर- ९३.४९% मिळवत पवना शाळेसह पवना नगर केंद्रांत प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक हे कु साक्षी गणपत कालेकर- ८६.६०% कु प्राची महेंद्र जव्हेरी- ८६.६०% यांनी मिळवले तर तृतीय क्रमांक कु दिक्षा लक्ष्मण कालेकर- ८६.२० % हिने मिळवला आहे.

ह्या सर्व विद्यार्थांंना त्यांचे वर्गशिक्षिका मंजुषा गुर्जर,रोशनी मराडे,वासंती काळाखे यांच्यासह पांडूरंग ठाकर,निला केसकर, बापूसाहेब पवार,महादेव ढाकणे,सुनिल बोरुडे,भारत काळे,संजय हुलावळे,राजकुमार वरघडे,वैशाली व-हाडे,अनिता आगळमे व सर्व अध्यापक यांनी केले.

त्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे ,संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,प्राचार्य पांडूरंग ठाकर,सरंपच खंडु कालेकर,उपसरपंच फुलाबाई कालेकर,सदस्य रमेश कालेकर,ग्रामसेवक रविंद्र वाडेकर पर्यवेक्षिका निला केसकर,चेतन कालेकर यांच्यासह पवनानगर परिसरातील नागरिकांनी केले आहे.