मावळ (प्रतिनिधी): सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या,मुबई पुणे च्या मध्य स्थानी असलेल्या मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरामध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून वन विभागाच्या हद्दीमध्ये सर्रास पणे अतिक्रमण,वृक्ष तोड होत आहे.
पवनानगर परिसरामध्ये अनेक वर्षांपासून छोटे,मोठे उत्खनन व आतिक्रमन होत आलेले होते परंतु काही वर्षांपूर्वी आमर्जा हिल्स (नामक प्रॉपर्टी) यांची नजर पवनानगर या परिसरावर पडली यांनी शेकडो एकर जमीन कवडी मोल भावाने खरेदी करत त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म हाऊस बांधून ते फॉर्म हाऊस लाखो रुपयांनी विक्री करण्यास सुरुवात केली.
यांनी हे बंगलो,फॉर्म हाऊस उभारताना डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून तसेच वनविभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून बंगले उभारण्यात आले.
उत्खनन करताना अनेक जुन्या झाडांची कत्तल करून , निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे या सर्व गोष्टी वनविभागाला माहिती असून देखील वरिष्ठ अधिकारी या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे.
तसेच 2018 साली डोंगर, टेकडी परिसरात करण्यात आलेल्या अवैद्य बांधकाम विरोधात पर्यावरण आणि वन विभाग, महाराष्ट्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य जैवविविधता विभाग यांच्याविरुद्ध माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,सचिन मोहिते(सदस्य पर्यावरण समिती पुणे जिल्हा) बबन भाऊ कालेकर यांच्या सह आदी नागरिकांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये (एनजीटी) हित याचिका दाखल करण्यात आली होती व न्यायालयाने त्रि सदस्य समिती स्थापना करून अहवाल देखील मागवण्यात आला होता.
तरी देखील यांचे काम आजतागायत जोमात सुरू आहे.तसेच त्यावेळी सुमित चावला,मनोज सनानी यांच्या सह या परिसरातील अनेक धनादांडग्यांना यापूर्वी पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी नोटीसा देखील दिल्या होत्या तरी देखील प्रशासनाला दाद न देता आज त्यांची अतिक्रमणाची कामे जोमाने सुरू आहेत कुठेतरी या पाठीमागे स्थानिक प्रशासनाचा हात आहे. व या मध्ये वरिष्ठ अधिकारी यांचा देखील समावेश आहे का? अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे. तसेच या मध्ये आधिकाऱ्यांचा समावेश नसेल तर ते कार्यवाही का करत नाही असा प्रश्न सुज्ञान नागरिकांना पडलेला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून स्थानिक अधिकाऱ्यांना पुढील आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करावी.वन विभागाच्या हलकर्जीपणामुळे पवन मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्या कडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.एक झाडं तोडले की एक हजार रुपये दंड वन विभागाकडून आकारण्यात येत आहे. असे जर नियम असतील तर धनदांडग्या लोकांकडून कितेक झाडे तोडली जातील याचा विचार वन विभाग करत नाही तसेच या मुळे होणाऱ्या नुकसानाची जाणिव त्यांना नाही असे दिसून येत आहे.वन विभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण होत असून त्या कडेही वन विभाग अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
टेकड्यांवरील वृक्षतोड व बांधकामांमुळे केवळ निसर्गालाच नाही तर संपूर्ण मानवी जीवनाला धोका निर्माण होत आहे.याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे, की अवैध बांधकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलत चालला आहे.भूस्खलनाचा धोका निर्माण होत आहे. वनस्पती, प्राणी व पक्षी यांच्यावर परिणाम होत आहे.
तसेच मावळ तालुक्यातील पवनानगर भागामध्ये देखील दुसरे माळीन घडण्याची प्रशासकीय अधिकारी वाट बघत आहे का? मागील दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेश याठिकाणी एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे दोन झाडे तोडली म्हणून तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री महेन्द्र कुमार पलेचा यांनी संबंधित व्यक्तीला दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यातील अनेक धनदांडग्या लोकांकडून निसर्गाची अमानुषपणे लचकेतोड चालू आहे तरी वनविभाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत.तसेच या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण करुनच निसर्गाची अमानुषपणे लचकेतोड सुरु असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.