Sunday, April 21, 2024
Homeपुणेमावळपांगोळी धनगर वस्ती येथील उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका....

पांगोळी धनगर वस्ती येथील उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका….


प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे

मावळ तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील पांगोळी येथे धनगर वस्ती, ठाकर,व कातकरी वस्ती असुन याठिकाणी निसर्ग चक्रीवादलामुळे वीज वितरण कंपनीची डीपी व विजेच्या खांबाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ यांनी महावितरण कडे वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, जमिनीपासुन हाताच्या अंतरावर असलेल्या उघड्या डीपीमुळे लहान मुलांचा धक्का लागून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने याची गांभीर्याने दखल घेत सदर डीपीला तात्काळ झाकण बसवून नादुरुस्त झालेली विजवाहिनी सुरू करावी अशी मागणी माजी सरपंच तथा धनगर समाज मावळ तालुका अध्यक्ष बबन खरात यांनी केली आहे.
या परिसरात सुमारे एक हजार लोकवस्ती असून ही वस्ती तुंगार्ली धरणाच्या वरच्या बाजूस आहे, निसर्ग चक्रीवादलाने येथील घराप्रमाणे विज वितरण कंपनीची डीपी आणि खांब व वायर यांचे देखील नुकसान झाले होते, डीपी बॉक्स हा जमिनीला लागूनच असल्याने या परिसरात खेळणारी मुले, यांचा नकळत धक्का लागून मोठी दुर्घटना घडू शकते वादळानंतर तात्पुरती दूरस्थ केलेली विजवाहिनी अजूनही नादुरुस्त आहे,ती देखील अजूनही नादुरुस्त आहे.
या भागात सर्व ठाकर आदिवासी व धनगर समाज राहत असल्याने वीज वितरण कंपनी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे करत असताना सर्वसामान्य जनतेला महावितरण कंपनी ने न्याय द्यावा अशी मागणी माजी सरपंच बबन खरात यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page