Sunday, December 22, 2024
Homeक्राईमपाच जिल्हे हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक ,कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी…

पाच जिल्हे हद्दपार असलेल्या गुन्हेगारास अटक ,कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
पाच जिल्ह्यातून आपल्या गुन्हेगारी स्वरूपाची वागणुकीमुळे हद्दपार असलेला आरोपी दानसिंग गोविंद बारड, वय 36 वर्ष, धंदा – काही नाही, राह – कर्जत, मुळगाव – सूत्रापाडा, कृष्णावाडा, जिल्हा सोमनाथ, राज्य – गुजरात यांस नुकताच रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्तबगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस जवानांनी दमदार कामगिरी करून या आरोपीस जेरबंद करून कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत.


आरोपी दानसिंग गोविंद बारड यावर गुरनं ३० / २०२१ कलम ३७९ भादवि मध्ये ११५०० रु . किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन , गुरनं ४० / २०२१ कलम ३७९ भादवि मध्ये १२००० रु . किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन , गुरनं ४१ / २०२१ कलम ३७९ भादवि मध्ये ९००० रु . किमतीचा रेड मी कंपनीचा मोबाईल फोन ९०० रु . रोख रुपये भारतीय चलनी नोटा , अदखलपात्र गुरनं १५ /२०२१ कलम १२४ मपोका मध्ये १८००० रु . किमतीचे कानातील सोन्याचे झुमके , २००० रु . किमतीचे चांदीचे कमरपट्टा असा एकूण ५३४०० /- रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तसेच मा. पोलीस उप आयुक्त , मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई यांचे आदेशानुसार नमूद आरोपी हा जानेवारी २०२१ मध्ये एकूण पाच ( मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड ) जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले होते परंतु नमूद आरोपिताने सदर कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदर कामगिरी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे . याकामी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथक सपोनि ठोंबरे , पोना १४४२ – ठाकूर ,पोशि ११३७ – पठाण ,पोशि १०२९ – देवकर ,पोशि ९७१ – पवार आदी कर्जत रेल्वे पोलीस जवानांनी दमदार कामगिरी केली असल्याने , त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page