Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळापाच महिन्यांनंतर लोणावळा बस स्थानकावर बसगाड्यांची वर्दळ....

पाच महिन्यांनंतर लोणावळा बस स्थानकावर बसगाड्यांची वर्दळ….

(मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे)
लोणावळा : तब्बल पाच महिने बंद असलेल्या एस टी बस पुन्हा सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सर्वसामान्यांचा एस टी प्रवास सुरु झाल्याने प्रवासी सुखावले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील एस टी प्रवास सुरु झाल्याने लोणावळा एस टी बस स्थानकावर बसेसची ये जा सुरु झाली आहे.

त्यामुळे पाच महिने ओसाड पडलेल्या लोणावळा बस स्थानकात आज प्रवाशांची वर्दळ सुरु झालेली दिसली. एस टी बस सुरु करण्याच्या निर्णयाने जरी सर्वसामान्य प्रवासी सुखावला असला तरी लोणावळा बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी काहीही नियोजन अद्याप करण्यात आले नाही. जिल्ह्यातील प्रवासी बस ह्या स्थानकावर क्षणभर विश्रांतीसाठी थांबत असल्याने बसमधील प्रवासी ही इथे उतरत आहेत, स्थानकावर वावरत आहेत.

परंतु येथील स्वच्छता गृहाची अस्वच्छता पाहता त्यांना लघुशंका बाहेरच करावी लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एक तर कोरोनाचे सावट आणि त्यामध्ये एस टी स्थानकावरील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे.

- Advertisment -