पाटण – बोरज ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुनिता तिकोणे बिनविरोध…

0
51

मळवली : पाटण – बोरज ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता तिकोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते उपसरपंच दत्ता केदारी यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता . त्यामुळे सरपंच प्रविण तिकोणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली . यावेळी निर्धारीत वेळेत तिकोणे यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक नासीर पठाण यांनी सुनिता तिकोणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सरपंच प्रविण तिकोणे , माजी उपसरपंच दत्तात्रय केदारी , शालन शिळवणे , सदस्या प्रमिला कोंढभर , सोनल सणस , मालती केदारी , संदिप तिकोणे , काळुराम सणस , पंकज तिकोणे , विजय जाधव , अक्षय तिकोणे , अरुण तिकोणे , बंटी शिळवणे , गणेश तिकोणे , पांडुरंग कोंढभर , श्रीकांत तिकोणे , नितीन तिकोणे , उध्दव तिकोणे , माऊली तिकोणे , विघ्नेश तिकोणे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुनिता तिकोणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.