
(खालापूर दत्तात्रय शेडगे)
खालापूर दोन दिवसापासून सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आपटा गावाला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगड पाटबंधारे विभाग कोलाड च्या अहवालानुसार पाताळगंगा नदीची इशारा पातळी ही ओलांडली आहे.
सततच्या मुसळधार पावसाने पाताळ गंगा नदी चा १८ जुलै २०२१ च्या ९.०० वाजता च्या अहवालानुसार २०.३० मी धोक्याची पातळी ओलांडली आहे .
प्रशासनाने ग्रामस्थांना सूचित करून नदीच्या पात्रा जवळील नागरिकांना स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे . गावाला पुराचा वेढा असल्या कारणाने रसायनी – आपटाफाटा रस्ता पूर्णतः बंद आहे.