मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील पाथरगाव येथे चौदा फुटी महाकाय अजगर इंडियन रॉक आढळून आला.
आज रविवारी दुपारी 2:30 च्या सुमारास पाथरगाव येथील आदिवासी बांधवाच्या झोपडीत आढळलेल्या या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पाथरगाव येथील आदिवासी बांधवाच्या झोपडीत अन्नाच्या शोधात असलेला 14 फुटी इंडियन रॉक पायथन अर्थातच महाकाय अजगर आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना दिली . माहिती मिळताच संस्थेचे सदस्य तात्काळ पाथरगावच्या दिशेने निघाले . अवघ्या काही वेळातच संस्थेचे सदस्य विशाल केदारी व कालिदास केदारी हे तिथे पोहोचले . त्यांनी सुरक्षितरित्या अजगराला पकडले व याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव व संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना कळवली.
त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे व सदस्य गणेश निसाळ , तुषार अ . सातकर , सत्यम सावंत , तुषार ओव्हाळ , जिगर सोळंकी यांच्या मदतीने निलेश गराडे यांनी अजगराची प्राथमिक तपासणी करुन त्याला वनरक्षक साईनाथ खटके यांच्या उपस्थीतीत सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.