Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपार्थ पवार फाउंडेशन व कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम !

पार्थ पवार फाउंडेशन व कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम !

कर्जतमध्ये पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील नदी किनारी असलेल्या प्रभागात दि .२१ जुलै २०२१ रोजी उल्हास नदीची पाण्याची पातळी ओलांडल्याने महापूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसले.यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.भरला संसार व साहित्य खराब झाले,तर अन्नाची देखील नासाडी झाल्याने नागरिकांची खूपच दयनीय अवस्था झाली.

म्हणूनच कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पार्थ पवार फाउंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जपत या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम अन्न – धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून केले.पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या सूचनेनुसार पार्थ पवार फाऊंडेशन च्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून संसार उपयोगी वस्तू व किराणा सामान वाटप करण्यात आले.

यावेळी कर्जत आमराई , बांमचा मळा, इंदिरानगर,संजय नगर ,छत्रपती शिवाजी महाराज नगर व इतर दहिवली भागात पूरग्रस्त बांधवाना किराणा सामान व इतर दैनंदिन आवश्यक वस्तूंचे वाटप मदत म्हणून वितरित करण्यात आले.

यावेळी पार्थ पवार फाउंडेशन व कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक शरदभाऊ लाड ,नगरसेविका सुवर्णा निलधे ,माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड,माजी नगरसेवक मिलिंद चिखलकर,अतुल पवार,सुहास वांजळे,सुशांत लाड, मल्हारीशेट माने,संदीप लाड जयवंत म्हसे,केशव वांजळे,हृषीकेश लाड, वैभव लाड,अनिल पवार, ऋषभ लाड,आकाश लाड अभि मोरे, मयूर लाड,दर्शन लाड , गुड्डू लाड , सतीश वाघमारे,युसूफ खान, दशरथ जाधव,रितेश देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवळपास ३०० कुटुंबियांना हे अन्न – धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page