माथेरान(दत्ता शिंदे) पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 12मे 2021 रोजी माथेरान पाणीपुरवठा समस्या आणि उपाययोजना बाबत ऑनलाइन बैठकी दरम्यान खालील विषयांवर विचारविनिमय झाला.माथेरान गिरीस्थान हे वन व पर्यावरण विभागाकडील ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेनुसार पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेले असून रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.
माथेरान गिरीस्थान हद्दीत शुद्ध पाणीपुरवठा करणेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे असून त्यांचेमार्फत शहरास नियमित पाणीपुरवठा केला जातो.माथेरान हद्दीत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असल्याने सर्व कामे मानवी श्रमाने करावी लागतात.सर्व कामे मानवी श्रमाने करावे लागत असल्याने याठिकाणी महागाईचे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात आहे.महागाईचा परिणाम प्रत्यक्षरित्या सामान्य नागरिकांवर होतो व अप्रत्यक्षरित्या माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या पर्यटकांवर होतो.
माथेरान हद्दीत शुद्ध पाणीपुरवठा करत असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याचे दर याठिकाणी खूप जास्त प्रमाणावर आहे. माथेरान हद्दीतील पाण्याचे दर सर्व ठिकाणच्या पाण्याच्या दराच्या तुलनेत खूप जास्त पटीत आहे.त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष सामान्य नागरिकावर आर्थिक भार पडत आहे.त्यामुळे सदरील पाण्याचे दरात कपात करणेबाबत देखील याआधी मा.गुलाबराव रघुनाथ पाटील,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र शासन यांचेकडे देखील सदरील बाबतीत पाठपुरावा करणेत आलेला आहे.
तसेच मा.नगराध्यक्षा,माथेरान गिरीस्थान नगरपरिषद ,यांचे अध्यक्षतेखाली व मा.अधिक्षक अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ,पनवेल यांचे उपस्थितीत दि.०४/०५/२०२१ रोजी मिटिंग आयोजित करण्यात आली.चर्चे दरम्यान उपस्थित झालेले ठळक मुद्दे १.माथेरान शहरास अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.तो सुरळीत करणेबाबत उपाययोजना करण्यात याव्या.
२.नेरळहून रोज ६-८ तासाच पाणी येते ते कमीत कमी १६ तास येण्याकरिता उपाययोजना करणे.३.नेरळ-जुम्मा पट्टी-वाटर पाईप चे दरम्यान पाईप लाईनला असलेल्या कनेक्शनला पाणी आकारणी करणे व दररोज २ ते 3 तास पाणी देणे.४.नेरळ-जुम्मा पट्टी-वाटर पाईप चे दरम्यान पाईप लाईनला असलेली लीकेजेस काढणे.
५. नेरळ-जुम्मा पट्टी-वाटर पाईप चे दरम्यान पाईप लाईनला असलेल्या कनेक्शन एकाच ठिकाणी पाईप टाकून देणे.
६.तलावातील गाळ काढणेकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत कमीत कमी १०.०० लक्ष निधी उपलब्ध करून द्यावा.७.माथेरान मधील शार्लोट लेक येथील धारण हे ब्रिटीशकालीन असून धरणाच्या भिंतीला बऱ्याच ठिकाणी भेगा पडलेल्या असून सदरील ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक असूनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदर काम तातडीने करून घ्यावे जेणेकरून माथेरान मधील नागरिकांना जास्तीत जास्त पाणीसाठा उपलब्ध होईल.
८.माथेरान मधील शार्लोट लेक हे एकमेव धरण असून सदरील धरणाचा Catchment Area वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.तरी मजीप्रा ने सदरील धरणाचा Catchment Area वाढविण्याच्या दृष्टीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्या. ९.मजीप्रा मार्फत बांधण्यात आलेल्या नवीन फिल्टरची कामे पूर्ण करून घेण्यात यावी.
१०.माथेरान नगरपरिषदेमार्फत बरेच ठिकाणी विकास कामे सुरु आहेत.ज्या ठिकाणी नवीन रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे.तेथील पाईपलाईनची कामे तसेच कनेक्शन शिफ्टींग ची कामे ताबडतोब पूर्ण करावे.११.उल्हास उद्धवावरील पंपिंगस्टेशनकरिता एक्प्रेस फिडरद्वारे विद्युत पुरवठा करण्याकरिता मजीप्रा ने तातडीने योग्य उपाययोजना कराव्या.१२.इंदिरानगर येथील पाईप लाईनची काम केल्यानंतर एक महिना झाला तरीही पेवर ब्लाक बसविनेत आलेले नाहीत ,ते बसविनेत यावे.१३.कार्यकारी अभियंता ,पनवेल यांचेकडे काही प्रस्ताव तांत्रिक मान्यतेकरीता आहेत,त्याबाबतची मंजुरी मिळावी.हे मुद्दे नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी या चर्चेत स्पष्ट केले.