Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात नागरिक एकवटल्याने आरपीआयच्या उपोषणाला यश !

पालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात नागरिक एकवटल्याने आरपीआयच्या उपोषणाला यश !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच गुरव आळी येथील ४ इंचाची पाण्याची पाईप लाईन टाकून अर्धवट अवस्थेत काम ठेवले होते तर हि पाईप लाईन शेवटपर्यंत नेली नसल्याने पाण्याची टंचाई जाणवत होती , यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण होते तसेच बौद्ध नगर व गुरवआळी येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था होऊन २ वर्षे झाली तरी या महत्त्वाच्या गंभीर समस्यांकडे कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाच्या बरोबरच सत्ताधारी लोकप्रतिनिधी देखील वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत असल्याने आरपीआय ( आठवले ) पक्षाचे कर्जत शहर सचिव सुनिल मालू सोनावणे व कर्जत शहर युवक अध्यक्ष राहुल रघुनाथ गायकवाड यांनी या पालिकेच्या बेजबाबदारपणा विरोधात दंड थोपटले होते.
याविरोधात आज दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी संविधान चौक – दहिवली , मराठी शाळेजवळ सकाळी १० वाजता आमरण उपोषणास बसले होते . आरपीआय पक्ष पालिकेत सत्तेत असूनही पक्षाचे पदाधिकारी उपोषणाला बसल्याने व एक महिला नगराध्यक्षा असूनही महिलांच्या पाणी व शौचालयाच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे सर्व नागरिक , पत्रकार एकवटल्याने अखेर पालिका प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून मागण्या मान्य करून लवकरच कामे सुरू करू , असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण तूर्त मागे घेत संपविण्यात आले.

कर्जत नगरपरीषदेच्या बेजबाबदार कारभारा विरोधात आज सकाळीच कर्जत दहीवली येथील आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी व गुरव आळी येथील ग्रामस्थांनी व महिलांनी उपोषण सुरू केले होते . या उपोषणाचा कर्जत नगर परिषदेने चांगलाच धसका घेतला आणि उपोषण कर्त्यांच्या मागण्या पुर्ण करणेबाबत उपोषण कर्त्यांना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचे लेखी पत्र दिल्यानंतर अखेर हे उपोषण मागे घेणेत आले आहे. दरम्यान आरपीआय कार्यकर्त्यांच्या उपोषणास सर्व ग्रामस्थ , पत्रकार बंधू एकत्र आल्यानेच यश मिळाले व प्रशासन झुकले असे सर्वत्र बोलले जात असुन दहीवलीमधील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
लवकरच हे काम सुरू करणेत येणार असल्याचे नगरपरीषद प्रशासनाकडून प्रशासकीय अधिकारी गोसावी , सुनील लाड , अभियंता मनीष गायकवाड , दयानंद गावंड यांनी लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले आहे.यावेळी या उपोषणाच्या ठिकाणी कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड , आरपीआयचे जेष्ठ नेते मारुतीदादा गायकवाड , नगरसेवक राहुल डाळींबकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जेष्ठ नगरसेवक नितीनदादा सावंत, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती अशोक ओसवाल, नगरसेवक संकेत भासे , राजेश जाधव , विजय जिनगरे , आरपीआय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड , जिल्हा पदाधिकारी मनोज गायकवाड , शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद मोरे , कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड , वंचितचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे ,एस आर पी शहर अध्यक्ष सुभाष सोनावणे ,युवा अध्यक्ष अमर जाधव , सचिव प्रविण गायकवाड , आरपीआय महिला ता. अध्यक्षा अलका सोनावणे, शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले , माथेरान शहर अध्यक्ष अनिल गायकवाड ,विजय जाधव , बसपाचे रायगड जिल्हा प्रभारी सचिन भालेराव , सचिव उज्वलाताई सोनावणे, पॅंथर सेनेचे सुशिलभाई जाधव, बाळासाहेबांची शिवसेना कर्जत उपशहर प्रमुख दिनेश कडु , रमाकांत जाधव , किशोर जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत संघर्ष समितीचे सदस्य कृष्णा जाधव , नंदू गुरव , संजय वरघडे , यांसह अनेक आरपीआय कार्यकर्ते , दहिवली बौद्ध नगर , गुरव आळी ग्रामस्थ , महिला उपस्थित होते . यावेळी उपोषणकर्ते सुनील सोनावणे आणि राहुल गायकवाड यांना ज्युस पिण्यास देवुन उपोषण सोडण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page