Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपाली फाटा येथे वाहनाच्या धडकेने अनोळखी इसमाचा मृत्यू, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा...

पाली फाटा येथे वाहनाच्या धडकेने अनोळखी इसमाचा मृत्यू, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल…

खोपोली (प्रतिनिधी): दि. 3 डिसेंबर 2022 रोजी पुणे-मुंबई हायवेवर खोपोली सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोसई मोहिते पेट्रोलींग करत असताना एक अनोळखी इसम पाली फाटा येथील ब्रिजच्या खाली हायवेवर पुणे लेनवर जखमी अवस्थेत पडलेला आहे याबाबत कॉल आला.
सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम सदरील घटनास्थळी गेले असता इसम जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले सदर अनोळखी पादचारी इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून त्यास तात्काळ रुग्णवाहिकेतून खोपोली नगरपरिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाले असल्याचे सांगितले.
सदर अनोळखी पादचारी इसमास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघातात लहान-मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून मरणास कारणीभूत होऊन वाहन चालक पळून गेले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात भा. द. वी. कलम 304 अ, 279, 337, 338, 184, 134 या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने करत आहेत. तसेच अनोळखी इसम कोणाच्या ओळखीचे किंवा माहिती असल्यास खोपोली पोलीस ठाणे 02192263333,तसेच तपासी अधिकारी 9637140044 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page