Thursday, September 12, 2024
Homeपुणेवडगावपावसाने दडी मारल्यामुळे वडगावातील शेतकऱ्याने बोरिंगच्या पाण्याने केली उत्तम भात लावणी..

पावसाने दडी मारल्यामुळे वडगावातील शेतकऱ्याने बोरिंगच्या पाण्याने केली उत्तम भात लावणी..

वडगाव : वडगाव शहरातील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय केरू ढोरे यांनी वडगाव शहरात सर्वात प्रथम केली भात लागवड.ऐन भात लागवडीच्या वेळेत पावसाने दडी मारली आहे त्यामुळे मावळातील शेतीची कामे पाण्याविना खोळंबळी आहेत. भात लागवडी साठी शेतात जास्त प्रमाणात पाणी साठवले जाते.

परंतु अनेक दिवसांपासून पावसाने उघड घेतल्यामुळे मावळातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. ऐन भात लावणीच्या वेळी पावसाने पाठ फिरविली असल्यामुळे बळीराजा चिंतेत अडकला आहे.शेतात मुबलक पाणी नसल्यामुळे भात लावणी करायची कशी ही चिंता शेतकरी कुटुंबांना सतावत आहे

.भात लागवडीची कामे पूर्ण पणे थांबली असून काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्यामुळे मावळातील सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना वडगाव शहरातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय ढोरे यांनी मात्र बोरिंगच्या सहाय्याने शेतात पाणी घेऊन शहरात सर्वात प्रथम व उत्तम भात लावणी केली आहे.यांच्या या प्रगतशिलतेचे शहरातून सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page