Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळापावसाळा येण्यापूर्वी लोणावळा शहरात वाहतूक कोंडी वर उपाययोजना करावी, जितेंद्र कल्याणजी यांचे...

पावसाळा येण्यापूर्वी लोणावळा शहरात वाहतूक कोंडी वर उपाययोजना करावी, जितेंद्र कल्याणजी यांचे लो.न.पा.ला निवेदन…

लोणावळा(प्रतिनिधी):शहरातील कुमार चौक ते मावळा पुतळा वाहतूक कोंडी लक्षात घेता पावसाळा येण्यापूर्वी उपाय योजना करावी याबाबत चे निवेदन शिक्षण मंडळ मा.सभापती व शहर काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र धीरजलाल टेलर (कल्याणजी ) यांनी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना दिले.
त्यात जितुभाई यांनी म्हटले आहे की लोणावळा शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठया प्रमाणात आहे. त्यातच आता पावसाळा आला की पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने कुमार चौक ते मावळा पुतळा रस्त्यावरील मॅकडोनाल्ड मॉल समोरील रेल्वे ब्रिज शेजारील खड्डा बुजवून रस्ता रुंदीकरण करावे, तसेच याठिकाणी असलेली जंगली झाडे काढून टाकावीत म्हणजे येथे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. पर्यटकांस व लोणावळयातील नागरीकांना होणा-या त्रासाबाबत जर रेल्वे ब्रिज ओलांडून रोडच्या डाव्या बाजूला व मॉलच्या समोर असलेला खड्डा भरणी केल्याने रोड थोडा मोठा होईल त्याने वाहतूक सुरळीत होईल तसेच याठिकाणी वळण असल्यामुळे टू व्हिलर व इतर वाहनांचे अपघात होणार नाहीत.त्याचबरोबर याठिकाणी असलेली जंगली झाडी काढण्यात यावी,याठिकाणी पावसाळयामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी साचते त्यामुळे नागरीकांना, पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो, तसेच वाहतूक कोंडी देखील मोठया प्रमाणात होत असते यासाठी आपण पावसाळा सुरू होण्या आगोदर लवकरात लवकर उपययोजना करावी असे जितुभाई यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच लोणावळा नगरपरिषदेणे महावीर चौक ते कुमार रिसॉर्ट पासून मावळा पुतळा पर्यंतचा रस्ता. कुमार रिसॉर्ट समोरील रेल्वे ब्रिजला लागून रस्ता रुंदी व डांबरीकरण तसेच रेल्वे ब्रिज ओलांडून डाव्या बाजूला केलेल्या पार्कींगची सोय यासाठी मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन ही निवेदनातून केले.
- Advertisment -