Thursday, May 30, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडपिंपरी मर्चंट फेडरेशनचे सामूहिक मतदान..

पिंपरी मर्चंट फेडरेशनचे सामूहिक मतदान..

पिंपरी : प्रतिनिधी ( श्रावणी कामत ) पुणे (दि.१३ मे २०२४) सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावत लोकशाही बळकट करावी या उद्देशाने पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या वतीने सर्व सभासदांना फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत फेडरेशनच्या ५०० पेक्षा जास्त सभासदांनी सहकुटुंब आज मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान करून आलेल्या मतदारांना पिंपरी कॅम्प मधील उबाडा धर्मशाळा येथे अल्पोपहार घेण्याचे नियोजन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते.
यासाठी अनिल आसवानी, श्याम मेघराजानी, नीरज चावला, सुशील बजाज, प्रकाश रतनानी, संजय नागदेव, जगदीश आसवानी, प्रकाश समतानी, कैलास कुकरेजा, अनिल मूलचंदानी, जय गोविंदवानी, हरेश पगराणी, अनिल कटारिया, महेश मोटवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. असा प्रयत्न पिंपरी चिंचवड परिसरातील व्यापारी संघटनेने पहिल्यांदाच केला असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page