Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपुढील नगराध्यक्ष शिवसेनेचाच -कर्जत शहर संघटक नदीम भाई खान..

पुढील नगराध्यक्ष शिवसेनेचाच -कर्जत शहर संघटक नदीम भाई खान..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांनी व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या झंझावाती कार्यामुळे कर्जत खालापूर तालुक्यासह कर्जत शहरातील वातावरण भगवेमय झाले असून येणाऱ्या सन २०२४ च्या निवडणुकीत सन २०१९ साली झालेली पुनरावृत्ती पुन्हा होवून मावळ लोकसभा ” खासदार ” त्यांचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघाचा ” आमदार ” व कर्जत नगर परिषदेचा ” नगराध्यक्ष ” देखील शिवसेनेचाच होणार असून ” गाव तेथे शाखा , व घर तेथे शिवसैनिक ” अशी व्यूहरचना आखून पुढील येणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत पालिकेवर ” भगवा फडकावून ” , नगराध्यक्ष शिवसेनेचाच निवडून आणणार , असा ठाम विश्वास शिवसेनेचे कर्जत शहर संघटक सर्वधर्मसमभावाचे प्रतीक शिवभक्त नदीम भाई खान यांनी व्यक्त केला.

शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा प्रेरणा मंत्र असलेल्या शिवसेना या मंत्रमुग्ध चार अक्षराच्या सूर्याचा उदय ७० च्या दशकात झाला .१९ जून १९६६ ला झालेल्या शिवसेनेच्या जन्माची आज ध्येयवेड्या शिवसैनिकांच्या कठोर परिश्रमातून ५८ वर्ष अखंडपणे धगधगत राहणारा हा ” यज्ञकुंड ” शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचाराने आजही प्रज्वलित आहे . थंड झालेल्या निखा-यावरच्या राखेला फुंकर घालून चैतन्य जागवून हा संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करण्याची ताकद फक्त शिवसेनेत व ” सिंहासनाधिश्वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांच्यात होती , हे या महाराष्ट्राने पाहिले आहे . ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असा महामंत्र असलेल्या शिवसेनेत मी मुस्लिम समाजाचा असलो तरी ” प्रेरणास्थान शिवचरित्र व्याख्याते स्वर्गीय साबीरभाई शेख व अनंतकाका जोशी ” यांच्या सानिध्यात आल्याने सर्वधर्मसंमभावाची प्रेरणा जागृत झाली , व अगदी लहानपणापासूनच शिवसेना या सूर्याची किरणे माझ्यावर पडली ,” जय महाराष्ट्र ” आवाज कुणाचा …शिवसेनेचा ” ! अश्या गगनभेदी घोषांनांनी माझा ” साईनगर परिसर ” दुमदुमला , अंग शहारले व शिवसेनेच्या या अग्निकुंडात मी झोकून दिले व भगव्याचा शिलेदार झालो ते आजवर ! यावर प्रकाश टाकत कर्जत शहर संघटक नदीम भाई खान यांनी आपले मत मांडले.

एका आंदोलनातुन जन्मलेल्या या माझ्यासारख्या ” वादळी  शिवसेनेच्या शिलेदाराची ” २०१० साली कर्जत विभाग प्रमुखाची माझ्यावर जबाबदारी गुरुवर्य स्वर्गीय अनंतकाका जोशी व कर्जतचे दानवीर, माझे आधारस्तंभ भाई गायकर यांनी सोपविली , ते हि मातोश्री च्या आशीर्वादाने ! शिवसेनाप्रमुख यांच्या ज्वलंत विचारांची छाप माझ्यावर लहानपणापासून असल्याने ” सर्वधर्मसमभावाची ” शिकवण उराशी बाळगून पक्ष श्रेष्ठीं देतील ते काम मी केले.माझ्या आजवरच्या कामामुळे मला शासनाच्या कर्जत पोलीस मित्र , रायगड जिल्हा शांतता मोहल्ला कमिटी सदस्य , साई मित्र मंडळ अध्यक्ष , सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष , हजरत सय्यद युसूफ शा बाबा दर्गा उरूस कमिटी सदस्य , कर्जत मस्जिद सदस्य , सर्प मित्र , कर्जत ता .क्रिकेट असो .उपाध्यक्ष ,अशा विविध क्षेत्रात काम करत असताना युवकांना व गरजू नागरिकांना माझे जनसंपर्क कार्यालय ” महेंद्र गड ” येथून अहोरात्र मदत करून शिवसेनेत युवा फळी तयार केली आहे.
घर तेथे शिवसैनिक तयार करून शिव बंधनाचा धागा गुंफला आहे ,यांत मुस्लिम युवक मोठ्या प्रमाणात आहेत . कर्जतमध्ये आज हि ” महेंद्र गडावरून ” गोरगरीब – दिन दुबळे , गरजू नागरिकांची कामे अहोरात्र करत आहे .सरकारी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेची मदत , अपघात ग्रस्तांना मदत , तहसील कचेरीत दाखले काढून देणे , पोलीस स्टेशनमध्ये भांडणतंटा मिटविणे , पालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविणे , प्रांत कार्यालयातील दाखले , समस्या सोडविणे , शेती विषयक शेतकरी बांधवांना मदत करणे , तरुणांना कला – क्रीडा , क्षेत्रामध्ये मदतीचा हात , धार्मिक कार्यक्रम , सण , उत्सव , यात आर्थिक मदत करणे , सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रात शाळेला – विद्यार्थ्याना मदत , साहित्य वाटप ,तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मदत , महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे , त्यांना निराधार पेन्शन योजना लागू करणे , छञपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती साजरी करून मदत करणे , अशी विविध कामांत अहोरात्र उपयोगी पडून शिवसेनेच्या मतांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.

त्यामुळे भविष्यात हि मोट इतर निवडणुका तसेच कर्जत न. प .च्या होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदानाच्या रुपाने मिळवून देणार असून शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने ,त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघात विकासाची गंगा आणून ” ऐतिहासिक विकास घडवून आणणारे व ग्रामीण भागात देखील सर्व समस्या सोडविणारे प्रखर लोकनेते व कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे , जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्या साथ सहयोगाने प्रेरित होऊन युवा फळीच्या सहकार्याने कर्जतकरांना व समाज बांधवांना अधिक प्रमाणात विकास कामांचा फायदा होण्यासाठी कर्जत न .प . वर शिवसेनेचा भगवा फडकविणारच , असे मार्मिक मत सर्वधर्मसमभावाचे जागते प्रतीक मुस्लिम समाजाचे , तरुणांचे आधारस्तंभ , सतत मदतीचा हात देणारे शिवसेनेचे शिवभक्त कर्जत शहर संघटक नदीम भाई खान यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे भविष्यात वरिष्ठांनी केलेली राजकीय व्यूहरचना व त्यांनी केलेल्या कार्यामुळे पालिकेवर भगवा फडकणारच , व त्यांच्या रूपाने लोकप्रतिनिधी म्हणून कर्जत न.प. मध्ये निवडून येण्यास त्यांचे कार्य नक्कीच फलस्वरुप असून शहर संघटक नदीम भाई खान यांचे स्वप्न सत्यात उतरणार , यांत शंखाच नसेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page