![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक सोमवार दि. ५ आँक्टोबर २०२० रोजी पिंपरी चिंचवड पत्रकार कक्ष महानगरपालिका पिंपरी चिंचवड येथे ठिक सकाळी ११ वा. संपन्न झाली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारीणी विस्तार करण्यात आला.त्यामध्ये पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य ,दै.सकाळचे पत्रकार बाबासाहेब तारे यांची पुणे शहर पत्रकार संघ अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संघटक दै.राष्ट्रवादीचे संपादक अजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे , पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा पत्रकार संघ समन्वयक सुनील नाना जगताप ,परिषद प्रतिनिधी पुणे एम.जी.शेलार, प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज ,लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड .संजय पाटील ,सरचिटणीस सतीश सांगळे,कोषाध्यक्ष मनोहर तावरे,कार्यकारीणी सदस्य अमित टाकळकर, दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले,उपाध्यक्ष प्रविण शिर्के, माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी ,पत्रकार हल्लाविरोधी प्रमुख अनिल वाघमारे, दौंड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष रमेश वत्रे ,बारामती तालुका पत्रकार संघ अध्यक्ष हेमंत गडकरी ,संघटक शहाजी तावरे,गोविंद तावरे ,संदिप मोरे आदीसह पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर बाबासाहेब तारे म्हणाले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली,राज्य कार्याध्यक्ष शरद पाबळे, सचिव बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.पुणे शहरात पत्रकार संघाची सदस्य नोंदणी वाढवून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
पत्रकारांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर नियुक्तीस अनुसरून लोणावळा शहर पत्रकार संघांचे सल्लागार, जेष्ठ पत्रकार शाम मोकाशी, चंद्रकांत जोशी, श्रीराम कुमठेकर तसेच लोणावळा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने पुणे शहर पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब तारे व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी पदावर नुकतीच निवड झालेल्या मावळ नागरिक प्रतिनिधी श्रावणी कामत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.