पुणे दि.3: पुणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (वय 54 वर्ष ) यांचे आज पहाटे कोरोना उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
राजेंद्र सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सरग यांनी सुरुवातीला तरुण भारत या दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली होती.
त्यांनतर त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली होती. आणि गेली चार वर्षांपासून ते पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरग यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. राजेंद्र सरग यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणा आणि पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.