Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळपुणे ते नेपाळ मराठा वॉरिअर्स ची सायकल मोहीम यशस्वी..

पुणे ते नेपाळ मराठा वॉरिअर्स ची सायकल मोहीम यशस्वी..

मावळ (प्रतिनिधी): पुणे ते नेपाळ अशी मराठा वॉरीअर्सची सायकल मोहीम फत्ते झाली आहे.मराठा वॉरिअर्स सायकल मोहिमेचा शुभारंभ 12 फेब्रुवारी रोजी भोसरी येथून झाला होता. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची सुरुवात झाली.
पुणे ते नेपाळ या मोहिमेचे अंतर 2023 किलोमीटर आहे. दोन देशांना जोडणाऱ्या या प्रवासात सर्व सहभागी वॉरीअर्सने मैत्रीचा, सामाजिक एकतेचा संदेश देत प्रवास केला. भारताने 75 वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांनी सर्वदूर पोहचवला.

यावेळी त्यांचा सुनौली बॉर्डर ते काठमांडू प्रवास हा खडतर राहिला.मराठा वॉरीअर्सने यापूर्वी 2017 मध्ये लेह लदाख बुलेट राईड, 2019 पुणे ते वाघा बॉर्डर सायकल प्रवास, 2021 मध्ये पुणे ते पानिपत सायकल प्रवास आणि 2022 मध्ये हम्पी बुलेट राईड अशा साहसी मोहिमा यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत.
या मोहिमेत बजरंग मोळक,नारायण मालपुटे, विश्वास काशीद,निलेश धावडे, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, संदीप जगताप, महादेव भवर, निमलेश तिवारी,अब्बास शेख हे वॉरीअर्स सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page