Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळापुणे बिकानेर रेल्वे एक्सप्रेसचे लोणावळा रेल्वे स्टेशनवर राजस्थानी ढोल वाजवून स्वागत…

पुणे बिकानेर रेल्वे एक्सप्रेसचे लोणावळा रेल्वे स्टेशनवर राजस्थानी ढोल वाजवून स्वागत…

लोणावळा (प्रतिनिधी): पुणे बिकानेर रेल्वे एक्सप्रेस चे लोणावळा रेल्वे स्थानकात राजस्थान जैन संघ लोणावळा व लोणावळा रेल्वे स्टेशन स्टाफ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच ट्रेन चालकांचा सन्मान करण्यात आला.
राजस्थान भागातील अनेक नागरिक लोणावळा, मावळ व पुणे भागात वास्तव्यास आहेत. त्यांना राजस्थान जाण्यासाठी आठवड्यातून किमान एक गाडी असावी अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. भारतीय रेल्वे विभागाकडून ही मागणी मान्य झाली असून मंगळवार (30 मे) पासून पुणे बिकानेर ह्या साप्ताहिक ट्रेनला सुरुवात झाली. पुणे स्थानकानंतर लोणावळा स्थानकात राजस्थान जैन संघाकडून या गाडीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, राजस्थान जैन संघाचे मांगीलाल ओसवाल, ललित ओसवाल, महेंद्र ओसवाल, प्रविण बोराना, करणशेट ओसवाल, किरण ओसवाल, आशिष बुटाला, ललित सिसोदिया, लोणावळा स्टेशन मास्तर राजपूत, नारायण पुरोहित, महेंद्र कुमावत आदी उपस्थित होते. राजस्थानी ढोल वाजवत गाडीचे स्वागत व चालकाचा सन्मान करत राजस्थान जैन संघाने जल्लोष केला.
- Advertisment -