Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपुणे मुबंई साठी पुढील चोवीस तास धोक्याचे,भारतीय हवामान विभागाची माहिती...

पुणे मुबंई साठी पुढील चोवीस तास धोक्याचे,भारतीय हवामान विभागाची माहिती…

पुणे(प्रतिनिधी) : मुंबईसह पुणेकरांसाठी पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने ( IMD ) ने दिला आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत असल्याने अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहेत. त्यात गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे . त्यामुळे पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात विशेष करुन पुण्यात आणि मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपले आहे. मुख्यता: मुंबई , ठाणे , पालघर , रायगड , पुणे यांच्यासह मुंबई उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे . त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटींग केल्याने अनेक ठिकाणचे रस्ते हे जलमय झाले असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page