Saturday, July 13, 2024
Homeपुणेपुण्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ...

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात”

पुणे:अष्ट दिशा, वृत्तसेवा, प्रतिनिधी, संतोष पवार,
दि.०५/०९/२०२०

पुणे: पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय शरद पवार मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी त्यांनी कोरोना च्या सर्व परिस्थितीची माहिती घेतली आहे.याबाबत अधिकाऱ्यांची शाळा घेतली आहे.

शनिवारी लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्या चार वेगवेगळ्या बैठका पवार यांनी बोलवल्या आहेत. पुणे शहरातील कोरोना ग्रस्तांचा आकडा खूपच वाढला आहे. त्यातच रुग्णांना बेड तसेच व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. राज्य शासनाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटर चा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी पुण्यातील बारामती होस्टेल या ठिकाणी पवारांनी अधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या.या बैठकीत त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कोणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

नेमके बिघडलेल्या परिस्थितीला कोणते घटक जबाबदार आहेत याची माहिती घेतली. तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये तक्रारी का जास्त आहेत. याची चौकशी केली.त्यावर सौरभ राव यांनी बोलताना सांगितले की. पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील तपासणी केली जात आहे. तसेच रुग्णांच्या उपचारासाठी उभारलेल्या जम्बो रूग्णालयातील त्रुटी दूर करून ते आता पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत आहे असे राव यांनी सांगितले.

पवार यांनी आज शनिवारी चार वेगवेगळ्या बैठका बोलले आहेत. त्यात लोकप्रतिनिधींच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, यांच्यासह महापौर आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page