Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपुण्यातील सामान्य कुटुंबातील एमसी स्टॅन ठरला बिग बॉस 16 व्या पर्वाचा विजेता…

पुण्यातील सामान्य कुटुंबातील एमसी स्टॅन ठरला बिग बॉस 16 व्या पर्वाचा विजेता…

मुंबई : बिग बॉस हिंदी 16 व्या पर्वाचा प्रथम क्रमांकाचा मान एमसी स्टॅन ने मिळविला असून सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दि.1 ऑक्टोबरला बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वाला सुरुवात झाली. आणि यावेळी सिझनची लोकप्रियता बघता शो एक्स्टेंड करण्यात आला. काल दि.12 रोजी बिग बॉस शो चा फिनाले पार पडला. यामध्ये मराठमोळा शिव ठाकरे आणि पुण्याचा एमसी स्टॅन यांनी सर्वांची मन जिंकत फिनाले मध्ये जागा बनवली.त्यात एमसी स्टॅन हा विजेता ठरला तर शिव ठाकरे हा उपविजेता ठरला.एमसी स्टॅनच्या संघर्षापासून यशापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर सलमान खानसह प्रेक्षकांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.
एमसीचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. सुरुवातीला त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले. कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असे. एक काळ असा होता की स्टेनकडे पैसे नव्हते आणि त्यांना रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण एमसी स्टॅनने हार मानली नाही आणि आज यशाचं शिखर गाठलं आहे. एमसी स्टॅनने त्याच्या गाण्यांमधून त्यांची जीवनकथा सांगितली आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला. वयाच्या 12 व्या वर्षी एमसीने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केले.एमसीने अनेक गाणी गायली आहेत. असे असले तरी ‘वाटा’ या गाण्याने त्याला खास लोकप्रियता मिळवून दिली.
यूट्यूबवर या गाण्याला जवळपास 21 मिलियन व्ह्यूज मिळाले. एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को ‘ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यात त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या गायकांना फॉलो केले. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल सांगितले.या गाण्याने एमसी स्टॅनबद्दल लोकांचा समज बदलला. ‘तडीपार’ हा अल्बम एमसी स्टॅनच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. या अल्बमने एमसी स्टॅनला प्रसिद्धी दिली. एमसी स्टॅनला भारताचे टुपॅक म्हणतात. एमसी स्टॅन हिप-हॉप म्युझिक इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.
हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी – बॉयिंग करत असे.एमसी स्टॅन केवळ 23 वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो करोडोंची कमाई करत आहे. त्याने ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियरला 60-70 लाख किमतीचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि 80 हजार किमतीचे शूज परिधान करून आला होता. एमसी स्टॅनने सांगितले की, त्याने अवघ्या 3-4 वर्षांत इतके नाव आणि पैसा कमावला आहे. हे ऐकून सलमानला धक्का बसला एमसी स्टॅन आपली गाणी,यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून दरमहा लाखो रुपये कमावतो.
आता एमसी स्टॅनने बिग बॉस च्या फिनाले पर्यंत मजल मारली होती. बिग बॉसचे 16 वे पर्व तो जिंकणार कि नाही हे मात्र येणारा काळच ठरवणार होता.मात्र आता एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वाचा विजेता ठरला. तर मराठमोळा शिव ठाकरेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एमसी स्टॅनवर यावेळी बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.यावेळी एमसी स्टॅन हा बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी आणि 31 लाख 80 हजार ही रक्कम देण्यात आली. त्याबरोबरच “Hyundai Grand i10 Nios ” ही गाडीही भेट म्हणून दिली गेली. सध्या त्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेकजण त्याला शुभेच्छाही देत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page