Thursday, October 10, 2024
Homeपुणेपुण्यात कोविड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना १५ दिवस सेवासक्ती जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश"

पुण्यात कोविड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना १५ दिवस सेवासक्ती जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश”


पुणे:पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात आता खाजगी डॉक्टरांनाही कोविड सेंटर मध्ये १५ दिवस सेवासक्ती द्यावी लागणार आहे. जे डॉक्टर सेवा देणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुण्यात कोरणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी डॉक्टरांना आता कोविड सेंटरमध्ये सक्तीने १५ दिवस सेवा द्यावी लागणार आहे.या आदेशातुन ५५ वर्षांवरील आणि काही आजार असलेले डॉक्टर वगळण्यात आले आहेत. तुम्ही कुठे सेवा देणार याबाबत तीन दिवसात माहिती द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पालिकेकडे पुरेसी डॉक्टरांची उपलब्धता नसल्यामुळे खासगी डॉक्टरांना आता १५ दिवस सेवा द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुणे,पिंपरी महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page