Wednesday, January 15, 2025
Homeपुणेमावळपुसाणे मावळ येथील घरे जळून खाक झालेल्या कुटुंबांना किशोर आवारे यांची आर्थिक...

पुसाणे मावळ येथील घरे जळून खाक झालेल्या कुटुंबांना किशोर आवारे यांची आर्थिक मदत…

मावळ (प्रतिनिधी) : चांदखेड पुसाणे येथील शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीमध्ये सात ते आठ घरे भस्मसात झाली होती . यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.ही घर कौलारू व लाकडी बांधकाम असल्याने घरांनी पेट घेतला.
यावेळी सात ते आठ घरांसाह घरामधील जीवनावश्यक वस्तुची या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकामेकांना लागून असलेली इतर घरे गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे आगीच्या झोतात येण्यापासून वाचली .
आगीची घटना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची अग्निशमन दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी पाठवून दिली होती व जळीतग्रस्त कुटुंबाची घटनास्थळी भेट घेऊन त्या कुटुंबाना आर्थिक मदत केली . तसेच पिढीत कुटुंबाना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनकडे प्रयत्न केले . प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मधुसुदन बर्गे , मंडल अधिकारी संगीता शेरकर , तलाठी राहुल गायकवाड , सोमनाथ कालेकर यांनी उपस्थित राहून तातडीची मदत या कुटुबांना केली .
तसेच पिडीत कुटुंबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आवारे यांनी सांगितले . यावेळी त्यांच्या समवेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ जांभुळकर , कल्पेश भगत , सरपंच संजय आवंढे आदी जन उपस्थित होत.
- Advertisment -

You cannot copy content of this page