Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळापेट्रोल डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार, लोणावळ्यात काँग्रेस चे...

पेट्रोल डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार, लोणावळ्यात काँग्रेस चे केंद्र सरकार विरोधात आंदोलन…

लोणावळा (प्रतिनिधी):महागाई मुक्त भारत अंतर्गत लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई विरोधात काळे झेंडे घेऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज मंगळवार दि.8 रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.
देशात मोठया प्रमाणात महागाई वाढत असल्याने पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी., घरगुती गॅस सह अन्न धान्य दरात झपाट्याने वाढ होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झपाट्याने वाढ करून केंद्र सरकार गोर गरिबांची लूटमार करत असल्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या. महागाईचा भस्मासूर, नोट बंदी एक संघठीत लूट व पेट्रोल डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार असे फलक घेऊन व काळे ध्वज घेऊन मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
यावेळी काँग्रेस चे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. किरण गायकवाड, नासिर शेख, बाबुभाई शेख, पूजा गायकवाड, सिंधूताई कवीश्वर, संध्या खंडेलवाल, दत्ता दळवी, सरफराज शेख, नितीन नगरकर, अनिल गवळी, भरत खंडेलवाल, मनोज गवळी, मनिष गवळी, आकाश परदेशी, मंगेश बालगुडे, निलेश लोखंडे, अमोल शेडगे, अमित बारशे, योगेश गवळी, फय्याज शेख आदींसह काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page