Saturday, July 27, 2024
Homeपुणेमुळशीपेठ शहापूर येथील आदिवासी घरांना आग लागून चार कुटुंब उध्वस्त…

पेठ शहापूर येथील आदिवासी घरांना आग लागून चार कुटुंब उध्वस्त…

अंबावणे (प्रतिनिधी): पेठशहापुर येथील अचानक आग लागून तीन ते चार आदिवासी घरे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार दि. 24/2/23 रोजी घडली. आदिवासी घरांना भर दिवसा लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी घरासह घरातील सर्व वस्तू जळून मोठे नुकसान झाले आहे. तीन ते चार आदिवासी कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
दुर्घटनेची माहिती कळताच अंबवणे गावचे पोलीस पाटील गणेश श्री.दळवी यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली पेठशहापूर येथील हनुमंत मेंगडे यांनी अँबी व्ह्याली येथील अग्निशामक दलाला फोन करून तातडीने मदत मागितली. यावेळी ग्रामस्थ व अग्नीशामक दल यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
परंतु यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी योगिता बंडू पवार,संगीता सखाराम पवार, ईदुबाई भागू हिलम,पांडू सुकरु पवार ही चार कुटुंब उध्वस्त झाली आहेत.घरातील पैसे, दागिने,आधार कार्ड,पॅन कार्ड,रेशनिंग कार्ड,घरातील कपडे, भांडी, टिव्ही, अन्न धान्य इ. सर्व प्रकारच्या वस्तू जळून खाक झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी पेठशहापुर गावातील ग्रामस्थ अंकुश मेगडे .लक्ष्मण मेंगडे ,चंद्रकांत मेंगडे,दत्रातय मेंगडे, रूशिकेश मेंगडे,रामचंद्र जाधव, दामू महाळुंगे, मनोहर कराळे, योगेश कराळे,गणपत तिकडे आदीनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर घटनास्थळाची पोलीस पाटील गणेश दळवी यांनी स्वतः पाहणी करून तलाठी भाऊसाहेब अवचरे व मुळशी बीटचे पोलीस अधिकारी मुजावर यांस सविस्तर माहिती कळविली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page