Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडपॉवरलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राच्या बबन झोरेची शानदार कामगिरी,एक गोल्ड व एक सिल्वर मेडल...

पॉवरलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राच्या बबन झोरेची शानदार कामगिरी,एक गोल्ड व एक सिल्वर मेडल पटकाविले..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
महाराष्ट्राच्या बबन झोरे यांनी पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धेत गोल्ड मेडल आणि डेडलिफ्टमध्ये सिल्वर मेडल पटकावून, मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले.

या ऑल इंडिया ओपन चॅम्पियन्सशिप (नॅशनल लेव्हल ) स्पर्धा हरयाणा (सोहाना) मध्ये नुकताच पार पडल्या, यामध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या बबन झोरे याने पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला होता.

यात महाराष्ट्र मधील बबन झोरे याने 59 वजनी गटात महारष्ट्रचे नेतृत्व केले यावेळी पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धेत 122.5 किलो वजनी गटात गोल्ड मेडल आणि आणि डेडलिफ्टिंग स्पर्धेत 220 किलो वजनी गटात सिल्वर मेडल पटकावुन मागराष्ट्राचे नाव मोठे केले, त्यांच्या या कामगिरीमुले सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisment -