Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपॉवर लिफ्टिंग स्पर्धेत किरवली येथील " गायत्री बडेकर " सुवर्ण पदक मिळवून...

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत किरवली येथील ” गायत्री बडेकर ” सुवर्ण पदक मिळवून अव्वल !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका हा कला – क्रिडा क्षेत्रात अव्वल असून येथे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवून सुवर्ण पदक मिळवीत आहेत . त्यामुळे कर्जत तालुक्यां बरोबरच या खेळाचे व खेळाडूंचे कौतुक सर्वत्र होत असताना या ” बाहुबली ” खेळासाठी सर्वाँना प्रेरणादायी प्रोत्साहन , आशिर्वाद व सर्व सहकार्य करण्यासाठी ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” अशा विजयी खेळाडूंचे प्रेरणास्थान होवून खेळाडूंना उत्स्फूर्त पाठिंबा देणारे प्रेरणादायी कार्य करत आहेत . कर्जत तालुक्यातील किरवली गावची कन्या कु. गायत्री महेश बडेकर हिने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये राज्य स्तरावर ” सुवर्ण पदक ” मिळवून तिची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे . त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्यस्तरीय या पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ” अव्वल ” खेळ दाखवून कर्जत तालुक्याचे नाव ” रोशन ” करून सुवर्ण पदक मिळविल्या बद्दल कु. गायत्री महेश बडेकर या खेळाडूचा नुकताच खेळाडूंचे प्रेरणादायी ठरणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते ” बाळासाहेब भवन ” कर्जत येथे सन्मानित करण्यात आले , व पुढील राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कु. गायत्री महेश बडेकर हिचा सन्मान करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page