पोयंजे विभागात शेकापला खिंडार, अनेक कार्यकर्त्यानी केला शिवसेनेत प्रवेश..

0
74
प्रतिनिधी – दत्तात्रय शेडगे.
पनवेल तालुक्यातील पोयंजे विभागातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या त्वरित समस्या निवारण करण्याचे पद्धत वर विश्वास ठेवून पोयंजे विभागातील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, संपर्क प्रमुख अनंता पाटील, उद्योजक मोहन लबडे, उपतालुका प्रमुख जगदीश मते, माजी उपसभापती गजानन मांडे, उपतालुका संघटक सुधीर पाटील, विभाग प्रमुख नितीन पाटील, महेंद्र गायकर, किशोर पाटील, कमलाकर लबडे शाखा प्रमुख नरेश पडवळ, प्रणव लबडे आदीसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.