Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्रपोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी मिळावी-आमदार गोपीचंद पडळकर..

पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी मिळावी-आमदार गोपीचंद पडळकर..

आमदार गोपीचंद पडळकर यांचे गृहमंत्री यांना पत्र..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात गेल्या एक वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण विद्यार्थ्यांचे चालू आहे,
6 जानेवारी 2020 ते 7 जानेवारी 2021 या एक वर्षाच्या काळात हे प्रशिक्षण हे घेण्यात येत आहे.

मात्र कोरोना काळात अजून दोन महिने वाढवण्यात आल्याने येथील विद्यार्थी उमेदवाराणा आठ दिवसांची सुटी जाहीर करावी अश्या मागणीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राकडे केली आहे.


गेल्या 11 महिन्यात या विद्यार्थ्यांना एकही दिवस सुट्टी न दिल्याने येथील विद्यार्थ्यांच्या मनात पोलीस दलात येण्या ऐवजी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.


हे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागातील व सामान्य कुटुंबातील आहेत अनेकांच्या कुटूंबामध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत येथील उमेदवाराना आठ दिवसांनी सुटी जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री यांच्या कडे केली आहे.

- Advertisment -