Sunday, September 24, 2023
Homeपुणेलोणावळापोलीस प्रशासन सतर्क असूनही लोणावळा परिसरातील बंगले भाड्याने देऊन पार्ट्या सुरूच....

पोलीस प्रशासन सतर्क असूनही लोणावळा परिसरातील बंगले भाड्याने देऊन पार्ट्या सुरूच….

लोणावळा : पुणे जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पारित केलेल्या आदेशानुसार प्रांत संदेश शिर्के यांनी खाजगी बंगले भाड्याने दिल्यास बंगले धारक व बंगले भाड्याने घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून लोणावळा परिसरातील गोल्ड व्हॅली, तुंगार्ली तसेच खंडाळा परिसरातील अनेक बंगले भाड्याने देऊन तिथे वारंवार पर्यटक येऊन मौज मज्जा करत आहेत.
शहर परिसरातील हॉटेल मध्ये बसण्यावर प्रतिबंध असल्यामुळे बंगले भाड्याने घेऊन तिथे मद्यपान, हुक्का पार्टी, डान्स पार्टी करत पर्यटक मौज मज्जा करत असल्याचे चित्र दिसत आहे.सदर बंगलेधारक हे आपल्या मालकीचे बंगले परस्पर भाड्याने देत आहेत. आणि केअर टेकरला तेथील भागदौड संभाळायला लावत आहेत. बंगले भाड्याने दिल्यास पोलीस कारवाई करत आहेत अशी सूचना केअर टेकर कडून बंगला मालकांना देऊनही “आम्ही आहोत तु तुझे काम कर ” असे उत्तर बंगला मालकाकडून मिळत आहे.
अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन मात्र केअर टेकर वर गुन्हे दाखल करून कारवाई करत आहेत. परंतु बंगला मालक व तिथे आलेल्या पर्यटकांवर कारवाई होत नसल्याने ते मात्र मोकाटच असल्यामुळे परिसरातील अनेक बंगले भाड्याने देऊन पार्ट्या सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अशा बंगले मालक व बंगले भाड्याने घेणाऱ्यांवरही पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- Advertisment -