Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडअप्पर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांचा सत्कार..

अप्पर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांचा सत्कार..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषण कुमार उपाध्याय यांना यांना राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामुळे बोरघाट पोलिसांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अप्पर पोलीस महासंचालक वाहतूकचे भूषण कुमार उपाध्याय यांना कैवल्य धाम संस्था लोणावळा यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोषारी ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भूषण कुमार उपाध्याय यांनी नागपूर या ठिकाणी असताना या ठिकाणी योग प्रसारचा प्रचार करून लोकांमध्ये योग् अभ्यासची आवड निर्माण करण्यासाठी मोलाचे काम केले यांची दखल कैवल्य धाम या संस्थेने घेतली असून आज त्यांना राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामुळे त्यांचा आज बोरघाट महामार्ग पोलीस केंद्र यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम पाचोनकर, बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी,बागवान, पोलीस पीएसआय कांबळे,हवालदार प्रशांत बोंबे,आदीसह अनेक उपस्थित होते.

- Advertisment -