पोलीस मित्र संघटनाच्या वतीने कर्जत कशेळे व नेरळ कळंब एसटी बस सेवेची मागणी…..

0
77

दि.15.कर्जततालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी आणि शालेय विद्यार्थी खाजगी वाहन चालकांकडून खूप जास्तीत प्रमाणात पैसे खर्च होतो,त्याप्रमाणे त्यांची एकप्रकारे लूट होत असते,कोरोनाच्या महामारी सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

याकाळात प्रवासी वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली होती,यावेळी अनलॉकची स्थिती पूर्वपदावर होत असताना, त्याचप्रमाणे शाळा,कॉलेज,शासनाच्या नियमानुसार पालन करून चालू करण्यात आले आहे.त्याचवेळी कर्जत ग्रामीण भागातील एसटीबस सेवा बंद आहे.यावेळी प्रवास करतावेळी खाजगी वाहने अवाच्या सव्वा भाडे घेत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे प्रवासी वर्गाला आणि शालेय विद्यार्थीना परवडणारे भाडे नाही.

कळंब परिसरातील बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता पोशिर आणि नेरळ यावे लागते,लॉकडाऊन काळानंतर शासनाने नियमानुसार 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंत शाळा कॉलेज सुरू केले आहे.परंतु एसटी बस बंद असल्याने याचा फायदा खाजगी वाहन चालक,टॉक्सी रिक्षा घेत आहेत.सदर शालेय विद्यार्थी आणि प्रवाशी लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जोरधरू राहिली आहे.

यावेळी कर्जत एसटी बस व्यवस्थापक शंकर यादव यांना लेखी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे.तसेच पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी,यांच्या सहकार्याने केले जात आहे,आणि रायगड जिल्हा पोलीस मित्र संघटना अध्यक्ष किशोर शितोळे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे,युवा अध्यक्ष मिलिंद डुकरे,तालुका सेल उपाध्यक्ष शांताराम मिरकुटे,तालुका सेल उपाध्यक्ष गणेश केवरी,सदस्य सुभाष ठांणगे,रतन लोंगले, मयूर डांगरे इत्यादी आदी सह उपस्थित होते.