Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटनेच्या कोकण महासचिवपदी शुभांगी गणेश देशमुख यांची निवड !

पोलीस मित्र संघटनेच्या कोकण महासचिवपदी शुभांगी गणेश देशमुख यांची निवड !

कर्जत तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
पोलीस मित्र संघटना , नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार कार्याध्यक्ष गजानन भगत यांच्या वतीने कोकण विभाग महासचिव पदी शुभांगी गणेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल शुभांगी देशमुख यांचे सामाजिक – राजकीय – सांस्कृतिक – शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. सौ.शुभांगी गणेश देशमुख या कर्जत तालुक्यातील कर्जत नगर परिषद हद्दीत गुंडगे प्रभाग येथे रहात असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे काम नागरिकांच्या निगडीत आहेत.प्रभागातील समस्येच्या विरोधात आवाज उठविण्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात.

महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवून महिलांना न्याय मिळवून देणे, कौटुंबिक अत्याचार विरोधात होणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे,पिडीत महिलांना समुपदेशन करणे , विधवा महिलांना निराधार योजने अंतर्गत पेन्शन चालू करणे आदी कामे करत असून त्यामाध्यमातून समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे .म्हणूनच पोलीस मित्र संघटनेने त्यांना पुढील कार्य जोमाने करण्यासाठी कोकण महासचिव पदी नियुक्ती केली आहे .त्यामुळे पोलीस मित्र संघटनेची कर्जत तालुक्यात त्यांच्या निवडीने महिलांची विशेष ताकद वाढली आहे. शुभांगी गणेश देशमुख यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर कर्जत तालुक्यातुन महिला वर्गांचा व अन्य मान्यवरांचा त्याचप्रमाणे देशमुख मराठा समाजा तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page